मुंबई - 'मार्व्हल'चा 'अॅव्हेन्जर्स ऐन्डगेम' हा चित्रपट नुकताच बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत त्सुनामी लाट घेऊन प्रदर्शित झाला. प्रेक्षक या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करत असतानाचा प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्या प्रतिक्रियेने सर्वांचेच लक्ष वेधले.
कुछ ऐसा बोलो जो आपको शोभा दे, अव्हेंजर्स एंडगेमला कंटाळवाणा म्हटल्याने शोभा डे ट्रोल - social media
हा आतापर्यंतचा सर्वात कंटाळवाणा चित्रपट असल्याचे शोभा डे यांनी आपल्या ट्विटरवरून ट्विट करत म्हटले. सहाजिकच त्यांच्या या ट्विटमुळे अॅव्हेन्जर्सचे चाहते चांगलेच संतापले आणि चाहत्यांनी शोभा डे यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली
हा आतापर्यंतचा सर्वात कंटाळवाणा चित्रपट असल्याचे शोभा डे यांनी आपल्या ट्विटरवरून ट्विट करत म्हटले. सहाजिकच त्यांच्या या ट्विटमुळे अॅव्हेन्जर्सचे चाहते चांगलेच संतापले आणि चाहत्यांनी शोभा डे यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली. एका यूजरने 'कभी तो कुछ ऐसा बोलो जो आपको शोभा दे' असे म्हणत त्यांना टोला लगावला आहे.
तर काहींनी त्यांना कलंक पाहण्याचा सल्ला देत एंडगेम तुम्हाला समजणं अवघड असल्याचे म्हटले आहे. एकाने तर याला 'जनरेशन गॅप' म्हणतात असे म्हणत शोभा डे यांना सुनावलं आहे. एकंदरीतच आपल्या एका ट्विटमुळे एंडगेमच्या चाहत्यांच्या टोल्यांचा चांगलाच सामना शोभा डे यांना करावा लागत आहे.