मुंबई - आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, सुपरस्टार अजय देवगणने त्याच्या आयुष्यातील सर्व खास महिलांना एक हार्दिक संदेश समर्पित केला आहे. त्याच्या इंस्टाग्रामवर अजयने एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्याने त्याची आई वीणा, त्याच्या बहिणी नीलम आणि कविता, त्याची पत्नी-अभिनेत्री काजोल आणि त्याची मुलगी न्यासा यांच्यासह त्याच्या आयुष्यातील सर्व खास महिलांचा सन्मान केला आहे.
अॅनिमेटेड क्लिपद्वारे अजयने स्वतःची ओळख 'अजय देवगण' अशी नाही तर 'वीणाचा मुलगा, कविता आणि नीलमचा भाऊ, काजोलचा नवरा आणि न्यासाचे वडील' अशी करून दिली. अजयने पोस्टला कॅप्शन दिले, "मला अतिशय सुंदर पद्धतीने घडवल्याबद्दल सर्वांचे आभार.''
अजय देवगणच्या या पोस्टला एक लाखाहून अधिक व्ह्यूव्ज आणि हजारो चाहत्यांनी कॉमेंट्स केल्या आहेत. अजयच्या चाहत्यांनी हृदयस्पर्शी संदेशासाठी अभिनेत्याचे कौतुक केले. "नक्कीच उत्तम संदेश!!" असे एका चाहत्याने लिहिले. "प्रिय सर, तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे! फक्त उदार मन असलेला सज्जन माणूस हे करू शकतो,"असे दुसऱ्या चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले आहे.
8 मार्च दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचे स्मरण करणारा जागतिक दिवस आहे. हा दिवस लैंगिक समानतेला गती देण्यासाठी कृती करण्याचे आवाहन देखील करतो.
हेही वाचा -आलिया भट्टची 'हार्ट ऑफ स्टोन'मधून हॉलिवूड एन्ट्री, गॅल गडॉटसोबत करणार पदार्पण