मुंबई - अभिनेत्री प्रीती झिंटा आज ४५ वा वाढदिवस साजरा करीत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यात बॉलिवूड सेलेब्रिटी आघाडीवर आहेत.
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने तिला शुभेच्छा देत लिहिले आहे, हृदयाच्या सर्वात जवळ असलेल्या प्रीती झिंटाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू नेहमी आनंद वाटत राहा. स्वतःच्या हास्याने लोकांना खूश कर, खूप प्रेम.
रितेश देशमुखने स्वतःसोबतचा प्रीतीचा एक फोटो शेअर करीत शुभेच्छा दिल्या आहेत.
रितेशची पत्नी जेनेलिया देशमुखनेही प्रीतीला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. तिनेही रितेशचा फोटो शेअर केलाय.
अभिनेत्री कॅटरिना कैफनेही इन्स्टाग्रामवर प्रीतीसाठी शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली आहे. १९८८ मध्ये प्रीती झिंटाने दिल से या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या नावावर असंख्य हिट आणि लोकप्रिय चित्रपट आहेत. भैयाजी सुपरहिट या चित्रपटात ती सनी देओलसोबत शेवटची झळकली होती.