मुंबई- बॉलिवूडचा बाजीराव म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग याचा आज वाढदिवस. काही कालावधीतच लाखो प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या रणवीरवर आज वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांशिवाय कलाविश्वातीलही अनेकांनी रणवीरसाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत.
रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कबीर खाननं मागितली दीपिकाची माफी - birthday wish
रणवीर लवकरच कबीर खानचं दिग्दर्शन असलेल्या '८३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच पार्श्वभूमीवर कबीर खानने ही पोस्ट लिहिली आहे.
दिग्दर्शक कबीर खाननेही रणबीरसाठी खास पोस्ट लिहिली आहे. रणवीर लवकरच कबीर खानचं दिग्दर्शन असलेल्या '८३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच पार्श्वभूमीवर कबीर खानने ही पोस्ट लिहिली आहे. हॅप्पी बर्थडे रणवीर. ८३ चित्रपटाचा अनुभव आयुष्यभर लक्षात राहणारा आहे आणि या चित्रपटात तू कपिल देव यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारतोय याचा मला आनंद आहे. हा चित्रपट तुझ्या कमिटमेंटशिवाय आणि कामासाठी असणाऱ्या निष्ठेशिवाय करणं खूप कठीण होतं.
तुझा उत्साह संपूर्ण टीमला प्रेरणा देतो. पुढील वर्षही तुझ्यासाठी असंच प्रकाशमय ठरो, असे म्हणत कबीर खानने रणवीरला शुभेच्छा दिल्या आहेत. तर त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दीपिकादेखील दिसत असल्याने त्यांनी दीपिकाची माफी मागत म्हटले आहे, की सॉरी दीपिका पण माझ्याकडे रणवीर आणि माझा दुसरा फोटो नव्हता.