महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

वरुण धवन होणार बाबा? चाहत्यांमध्ये आनंदाची लहर - चाहत्यांमध्ये आनंदाची लहर

वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लव्हस्टोरीने आता प्रेमाचा दुसरा टप्पा पूर्ण केलाय. अलीकडेच करवा चौथच्या दिवशी अभिनेता वरुणने पत्नी नताशासोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले होते. या फोटोनंमतर चाहत्यांनी त्याला बाबा कधी होणार अशी विचारणा सुरू केली होती. नताशा प्रेग्नंट असल्याचा दावा काही चाहते करीत होते.

वरुण धवन होणार बाबा?
वरुण धवन होणार बाबा?

By

Published : Oct 28, 2021, 5:20 PM IST

वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लव्हस्टोरीने आता प्रेमाचा दुसरा टप्पा पूर्ण केलाय. अलीकडेच करवा चौथच्या दिवशी अभिनेता वरुणने पत्नी नताशासोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले होते. या फोटोनंमतर चाहत्यांनी त्याला बाबा कधी होणार अशी विचारणा सुरू केली होती. नताशा प्रेग्नंट असल्याचा दावा काही चाहते करीत होते.

वरुणने करवा चौथच्या दिवशी जो फोटो शेअर केला त्यामध्ये नताशा चाळणीतून वरुणचे मुखदर्शन करताना दिसते. यादिवशी पती आणि चंद्रांचे दर्शन अशा पध्दतीने करण्याची उत्तर भारतीय परंपरा आहे. यात काही फोटोमध्ये वरुणने पत्नी नताशाचा पोटावर हात ठेवलेला दिसतो. यावरुन चाहत्यांनी हे अनुमान काढायला सुरूवात केली.

बॉलिवूड स्टार वरूण धवन आणि नताशा यांचा विवाह सोहळा अलिबाग येथील सासवणे येथील मेन्शन हाऊस या रिसॉर्टवर पार पडला होता. 24 जानेवारी रोजी वरुण नताशासोबत बोलल्यावर चढला. थेट लग्नानंतरच या दोघांचे वेडिंग फोटो समोर आले होते.

कोण आहे वरुणची पत्नी नताशा?

नताशा दलाल एक फॅशन डिझायनर आहे. तिने न्यूयॉर्कमधून फॅशनचे शिक्षण घेतले. नताशाचे सर्व कुटुंबिय दिल्ली वास्तव्याला असते. ती फॅशन डिझयनर असूनही प्रसिध्दीपासून दूर असते. विवाहापूर्वी अनेकवेळा ती वरुणसोबत कॅमेऱ्यात कैद झालेली आहे.

लहानपणापासून नताशा आणि वरुणची ओळख

वरुण धवन आणि नताशा लहानपाणापासूनच एकमेकांना ओळखतात. मोठे झाल्यानंतर दोघांची पुन्हा एका म्यूझिक कॉन्सर्टमध्ये भेट झाली होती. त्यानंतर त्यांचे भेटत राहाणे सुरू झाले. आता त्यांचे हे भेटणे संसार सुरू करण्यापर्यंत पोहोचले आहे.

करिना कपूरच्या 'व्हॉट वूमेन वॉन्ट' या रेडिओ शोमध्ये लग्न करण्याविषयी बोलताना वरुण म्हणाला होता, ''पाहा, जेव्हा लग्नाची गोष्ट येते तेव्हा त्यात काही गैर नाही. जेव्हा तुम्ही कोणासाोबत इतके काळ एकत्र आहात आणि चांगल्या प्रकारे ओळखता तेव्हा लग्न करणे योग्य आहे. मी जेव्हा भावाला आणि वहिनीला पाहिले तेव्हा लग्न करण्याबाबतची जाणीव झाली. जेव्हा मी पुतणी नायराला पाहिले तेव्हा हे चांगले वाटले."

हेही वाचा - अंकित मोहनच्या ॲक्शनसोबत ‘बाबू'मध्ये दिसणार नेहा महाजनचे ग्लॅमर!

ABOUT THE AUTHOR

...view details