मुंबई- दाक्षिणात्य सुपरस्टार आपल्या बाहुबली सिनेमानंतर आता 'साहो' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटात त्याच्या अपोझिट श्रद्धा कपूर झळकणार आहे. शनिवारी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट पार पडला. यावेळी प्रभासनं माध्यमांशी संवाद साधला.
'बाहुबली'प्रमाणेच 'साहो'लाही प्रतिसाद मिळेल का? प्रभासनं दिलं असं उत्तर - अॅक्शन थ्रिलर चित्रपट
'बाहुबली'प्रमाणेच 'साहो'लाही प्रतिसाद मिळेल का? असा सवाल यावेळी केला असता प्रभास म्हणाला, 'बाहुबली'सोबत कोणत्याही चित्रपटाची तुलना होऊ शकत नाही. या सिनेमाने इतिहास रचला होता.
'बाहुबली'प्रमाणेच 'साहो'लाही प्रतिसाद मिळेल का? असा सवाल यावेळी केला असता प्रभास म्हणाला, 'बाहुबली'सोबत कोणत्याही चित्रपटाची तुलना होऊ शकत नाही. या सिनेमाने इतिहास रचला होता. बाहुबली चित्रपटाची तुलना कधीच कोणत्या सिनेमासोबत होणार नाही, यासाठी मी प्रयत्न करेल, असंही तो म्हणाला.
दरम्यान या कार्यक्रमाला प्रभासशिवाय श्रद्धा कपूर, निर्माता वामशी कृष्ण रेड्डी, प्रमोद उप्पलपति, भूषण कुमार, दिग्दर्शक सुजित यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली होती. ३०० कोटींचं बजेट असलेला साहो हा भारतातील सर्वात मोठा अॅक्शन थ्रिलर चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट ३० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.