मुंबई - सुपरस्टार सलमान खानचा राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई हा चित्रपट हायब्रीड रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ईद निमित्ताने रिलीज होणाऱ्या या चित्रपटाला कोरोनामुळे किती मोठी आर्थिक फटका बसलाय याची जाणीव असल्याचे सलमानने म्हटले आहे.
भारतात अजूनही कोरोनाची साथ आटोक्यात आलेली नसल्यामुळे हा चित्रपट पे- पर -व्ह्यू- रिलीजच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचणार आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीतल्या सलमानने अगदी स्पष्टपणे कबूल केले आहे की रिलीजनंतर चित्रपटाने कमाई करण्याच्या बाबतीत त्यांना फारशी आशा नाही.
"आम्हाला राधेमधून सर्वात कमी कमाई होईल. आम्ही कदाचित १०-१५ कोटी रुपयेही ओलांडू शकणार नाही. ज्यांना कमी कमाई झाल्यामुळे आनंद होणार असेल तो होऊ शकतो. काही लोकांना जास्त कमाई झाल्यामुळे आनंद होतो तर काहींना माझ्या कमी कमाईमुळे. राधेमधून आम्हाला तोटा झाला आहे आणि बॉक्स ऑफिस कमाईदेखील शून्य असेल. तरीही आम्ही राधेचे रिलीज करीत आहोत." असे सलमान म्हणाला.