मुंबई- बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माते राजीव कपूर यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिवंगत दिग्गज राज कपूर यांच्या तीन मुलांपैकी ते सर्वात धाकटे होते. रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे ते धाकटे भाऊ होते. राजीव यांच्या कारकीर्दीला यशस्वी बनवण्यासाठी त्यांच्या वडिलांकडे सर्व साधने होते. तरीही आर. के. फिल्म्सच्या बॅनरखाली काम करीत असताना अनेक संघर्षांची चव त्यांनी चाखली.
राजीव यांनी १९८३ मध्ये एक जान है हम या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि तीन वर्षांनंतर त्यांची खरी ओळख ब्लॉकबस्टर राम तेरी गंगा मैली या चित्रपटामुळे सर्वांना झाली. हा राज कपूर यांचा शेवटचा दिग्दर्शक म्हणून चित्रपट होता. त्यानंतर राजीव आपला भाऊ ऋषी कपूरसमवेत दिसले होते आणि दोघांनी राजीव यांच्या दिग्दर्शनाखाली प्रेमग्रंथ हा चित्रपटही बनवला होता.
आपल्या भावांच्या तुलनेत आपल्याला अधिक संघर्ष करावा लागला काय असे विचारले असता, राजीव म्हणाले होते की ऋषी आणि रणधीर यांच्यासारखे अभिनेता नाही तर नेहमीच त्याला दिग्दर्शक व्हायचे होते. मात्र योगायोगाने तो अभिनेता बनला, कारण तो राज कपूरचा शेवटचा मुलगा होता.
त्यांच्या संघर्षाबद्दल बोलताना राजीव यांनी शेअर केले होते, "अर्थातच मी (राज कपूर) यांच्याबरोबर माझ्या पहिल्या चित्रपटात काम केले नाही. मी एफसी मेहरा आणि त्याचा मुलगा (राजीव मेहरा) सोबत बाहेर काम केले होते. माझ्या वडिलांची मी असे करावे अशी इच्छा होती. वडिलांनी जसे केले तसेच मी करावे असे त्यांना वाटत होते. ते म्हणत असत की, 'तू बाहेर का जात नाहीस? राज कपूर यांनी प्रत्येक गोष्ट ताटात वाढून द्यावी असे तुला का वाटते?'