महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अमिताभ यांच्या हातावर क्वारंटाईनचा स्टँप; त्यांनी का शेअर केला फोटो? - Big B share quarantine stamp

अमिताभ बच्चन यांनी हातावर क्वारंटीनचा स्टँप असलेला फोटो शेअर केलाय. यात १४ दिवस आयसोलेशनमध्ये राहायचे असते. मात्र या फोटोमुळे अनेकांचा गैरसमज झाला.

Amitabh Bachan
अमिताभ बच्चन

By

Published : Mar 19, 2020, 5:15 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसच्या धोक्यापासून वाचण्यासाठी अनेक सेलेब्रिटी क्वारंटाईनमध्ये जात आहेत. व्हायरसच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी विलगीकरणाचा मार्ग सुरक्षित मानला जातो. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही हा एकाकी राहण्याचा मार्ग स्वीकारल्याचे दिसत आहे.

अमिताभ यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करीत याची कल्पना आपल्या चाहत्यांना दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना व्हायरसबद्दल जनजागृती करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. त्यांनी हातावर क्वारंटीनचा स्टँप असलेला फोटो शेअर केलाय. यात १४ दिवस आयसोलेशनमध्ये राहायचे असते. मात्र या फोटोमुळे अनेकांचा गैरसमज झाला.

अमिताभ यांनी शेअर केलेला फोटो अमिताभ यांचाच असल्याचा समज अनेक चाहत्यांचा झाला. खरेतर अशा प्रकारची शाई असलेला शिक्का हातावर असलेला व्यक्ती जर आढळला तर त्याला आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला द्या. हे सांगण्यासाठी त्यांनीहा फोटो शेअर केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details