बॉलिवूडचा शहनशाह अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र ही बातमी मीडिया आणि सिनेजगतापासून झाकून ठेवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिग बी यांना मंगळवारी पहाटे रुग्णालयात आणण्यात आले. नियमित चेकअपसाठी त्यांना भरती केल्याचे सांगण्यात येते. अजून एकदोन दिवस त्यांना रुग्णालयात थांबावे लागणार असल्याचेही समजते. रविवारी त्यांना घरी जाण्यास परवानगी मिळू शकेल.
बिग बी यांना 'पहाटे'च रुग्णालयात का भरती करण्यात आलंय? - Amitabh Bachan in hospital
अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र ही बातमी मीडिया आणि सिनेजगतापासून झाकून ठेवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिग बी यांना मंगळवारी पहाटे रुग्णालयात आणण्यात आले.
नानावटी रुग्णालयात त्यांना दाखल केल्याची बातमी गुप्त ठेवण्यात आली आहे. या रुग्णालयातील लोकांनाही याची कल्पना नाही. त्यांना जिथे ठेवण्यात आलंय तिथे कोणासही जाण्याची परवानगी नाही. त्यांना नियमित चेकअपसाठी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात येत असले तरी पहाटे त्यांना का भरती करण्यात आले हा प्रश्न चाहत्यांच्या मनाला पडला आहे. रुग्णालयाच्या वतीने मात्र ऑफिशियल हेल्थ बुलेटिन काढण्यात आलेले नाही.
अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. काल झालेल्या करवा चौथच्यावेळी ते रुग्णालयात दाखल होते. तरीही त्यांनी करवा चौथ संबंधीची पोस्ट ट्विटरवर पोस्ट केली होती. १७ ऑक्टोंबरला 'करवा चौथ'च्या निमित्ताने त्यांनी जया बच्चन यांचा एक अनसीन फोटो शेअर केला आहे. तसंच सर्व महिलांना त्यांनी 'करवा चौथ'च्या शुभेच्छाही दिल्या होत्या.