मुंबई - क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली होती. तब्बल 26 दिवसांनी आर्यन खानची तुरुंगातून सुटका झाली. यावेळी आर्यनला तुरुंगातून घरी आणण्याची अंत्यत महत्वाची जबाबदारी होती. जेव्हा जेव्हा शाहरुख खान किंवा त्याच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा त्याच्या अंगरक्षक रवी सिंगचे नाव नेहमीच समोर येते. यावेळीही आपल्या अंगरक्षक रवी सिंग याच्याकडे शाहरुख खानने आर्यनला घरी जबाबदारी सोपवली होती. तो रवी सिंग नेमका कोण आहे याबाबत जाणून घेऊया.
शाहरुखने सोपवली महत्वाची जबाबदारी -
आर्यनच्या सुटकेकडे गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून होते. तब्बल 26 दिवसांनी आर्यन खानची सुटका करण्यात आली. यावेळी आर्थर रोड जेलमधून घरी आणण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी शाहरुख खानने आपला अंगरक्षक रवी याच्यावर सोपवली होती. एवढी महत्त्वाची जबाबदारी सोपवलेला रवी सिंग हा सुपरस्टार शाहरुख खानचा खासगी अंगरक्षक आहे. रवी सिंग शाहरुख खानसोबत प्रत्येकक्षणी सावलीसारखा असतो. चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अंगरक्षकांमध्ये त्यांची गणना केली जाते.
रवी सिंग यांचा पगार तुम्हाला चकित करेल -
रवी सिंग गेल्या 10 वर्षांपासून शाहरुख खानची सुरक्षा सांभाळत आहेत. बॉलीवूड लाईफमधील एका रिपोर्टनुसार, रवी सिंग हा शाहरुख खानचा सुरक्षा प्रमुख आहे आणि त्याचा पगार वार्षिक २.७ कोटी आहे.