मुंबई- आपल्या देशात क्रिकेट आणि चित्रपट हे प्रांत प्रचंड लोकप्रिय आहेत. दोघांनाही ग्लॅमरचं वलय असल्यामुळे दोन्ही क्षेत्रातले सेलिब्रिटीज एकमेकांना ‘फॉलो’ करत असतात. काही क्रिकेटर्स मनोरंजनसृष्टीत दिसतात तर काही कलाकार क्रिकेट खेळताना. आता हेच बघाना. नुकताच भूमी पेडणेकरने जंगल पिक्चर्सच्या ‘बधाई दो’ च्या सेटवर राजकुमार राव क्रिकेट खेळत असतानाचा व्हिडीओ बनविला आणि तो ‘बीटीएस’ शेयर केलाय राजकुमार रावने. साधारणतः कुठल्याही चित्रपट वा मालिकेच्या सेटवर फावल्या वेळात क्रिकेट खेळलं जातं व बऱ्याच ठिकाणी स्त्री कलाकारही त्यात हिरीरीने भाग घेताना दिसतात.
भूमीने टिपले विरंगुळ्याचे काही क्षण
‘बधाई दो’ चे चित्रीकरण गेल्याच महिन्यात डेहराडून येथे सुरु झाले. ‘काम, काम आणि काम करून फक्त कंटाळाच येतो’ असे म्हटले जाते आणि म्हणून विरंगुळा महत्वाचा असतो आणि त्यामुळेच ‘बधाई दो’ चे ‘बॅक-टू-बॅक’ सीन्स केल्यावर शीण घालविण्यासाठी राजकुमारने सेटवरील माणसं गोळा करून क्रिकेट खेळला. भूमी पेडणेकरही त्यांच्यात सामील झाली होती व तिने ‘सिनेमॅटोग्राफर’ ची भूमिका निभावत विरंगुळ्याचे काही क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त केले.
गल्ली क्रिकेट खेळल्याने टीम उत्साही
या चलचित्र प्रतिमेत, राजकुमार उत्साही दिसतोय, ज्याने या चित्रपटासाठी मिश्या ठेवल्या आहेत, आणि क्रिकेट खेळताना आपली बॅट पराजताना दिसतोय. त्याचे फॅन्स त्याला ‘चियर’ करताना दिसताहेत. ‘मैदानात क्रिकेट खेळण्याची मजा काही औरच आहे’ असे म्हणत राजकुमाराने गल्ली क्रिकेटमधील आठवणी जागवल्या. एक टप्पा आउट, त्या भिंतीला लागले तर आउट, ई. नियम इथे लागू नसल्याबद्दल म्हटले ‘बधाई दो’. ‘गल्ली क्रिकेटचे नियम मैदानात लागू नसल्याने आमची संपूर्ण शूट-टीम क्रिकेट खेळून ताजीतवानी झाली’, असे राव याने सांगितले.