मुंबई- अभिनेता हृतिक रोशनची एफआयआर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर कंगना रणौतने पुन्हा त्याच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्याने परत एकचा विचित्र गोष्ट सुरू केल्याचे तिचे म्हणणे आहे.
दरम्याने गेल्या काही महिन्यापासून आजारी असलेले कंगनाचे आजोबा ब्रह्मचंद रणौत यांचे ९० व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचा शोक करणाऱ्या कंगनाने हृतिकवर जोरदार हल्ला चढविला असून त्याला बालिश ठरवण्याचा प्रयत्न केलाय.
ताज्या घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कंगनाने ट्विटरवर भाष्य केले आणि लिहिलं, "त्याची विचित्र कथा पुन्हा सुरू झाली आहे. आमचा ब्रेकअप झाल्यापासून आणि त्याच्या घटस्फोटाच्या कित्येक वर्षानंतर पण तो पुढे जाण्यास तयार नाही. मी माझ्या आयुष्यात थोडे धैर्य जमा करते तोच हा पुन्हा नाटक सुरू करतो.''
तिने पुढे हृतिकला त्यांच्या कथित संबंधांबद्दल त्रास देणे थांबवण्यास सांगितले आणि लिहिले, "हृतिक, तू छोट्याशा प्रेम प्रकरणासाठी अजून कधीपर्यंत रडणार?"