मुंबईः अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी, 'दिल बेचारा' चित्रपटात संजना सांघीच्या आईच्या भूमिकेत दिसतील. त्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरील पडद्यामागील फोटो शेअर केला आहे.
बीटीएस फिल्म्सच्या 'दिल बेचारा' या चित्रपटात स्वस्तिका यांनी आपली ऑनस्क्रीन मुलगी उन्हापासून वाचावी यासाठी छत्री धरलेली दिसते. दोघेही एका रिक्षात बसलेल्या दिसतात. तर दिल बेचाराचे दिग्दर्शक मुकेश छाबरा दोघींना सीन समजावून सांगत आहेत.
इन्स्टाग्रामवरील या फोटोत स्वस्तिका यांनी लिहिलंय, "आई नेहमी जास्त काळजी घेत असते, मग ते सुर्यकिरणे असोत की ह्रदय तुटलेले किंवा आजारी असो. एकदा आई, ही नेहमीची आई असते मग रिल असो की रियल."
अभिनेत्री संजना साकारत असलेल्या किझी या व्यक्तीरेखेबद्दलही स्वस्तिका यांनी एक पोस्ट लिहिली आहे. किझीला दीर्घायुष्याचा आशिर्वाद त्या देताना दिसतात.
स्वस्तिकाने संजनाबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल बोलण्याची ही पहिली वेळ नाही.
यापूर्वी, किझीसह एक मनमोहक फोटो शेअर करताना स्वस्तिकाने लिहिले होते: "संजना, संजू, तू नेहमी माझी किझीच राहशील. माझी मुलगी. मी मातृत्वासाठी नवीन नव्हते पण आपण जेव्हा एखादे काम करतो तेव्हा आपण आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेतो. ( म्हणजे कलाकार नेहमी शिकत असतो) आणि आम्ही एकत्र काम करण्यास सुरवात केल्यावर मला कधीच समजले नाही की सहकारी आपल्या मुलीसारखी कशी बनली. मला असे वाटते की तो उबदारपणा तुझ्यात आहे. एक आनंदी गोड भाग्यवान मुलगी जी आपली छाप निर्माण करण्यासाठी दृढ आहे आणि कदाचित ती तिच्यासाठी सर्व काही साध्य करते. शाईन ऑन मुली, आई तुझ्यावर नेहमी प्रेम करेल. "
हेही वाचा - दिल बेचारा टायटल ट्रॅक : सुशांतच्या नृत्यावर आणि हास्यावर नेटिझन्स फिदा
सुशांतसिंहच्या जाण्याने हा आगामी रोमँटिक चित्रपट लाखोंच्या ह्रदयात वेगळे स्थान निर्माण करणारा आहे. सुशांतने १४ जून रोजी जगाचा निरोप घेतला होता.
24 जुलै रोजी दिल बेचारा या चित्रपटाचा डिस्ने + हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रीमियर होईल.
मुकेश छाबरा दिग्दर्शित या रोमँटिक फ्लिकला जॉन ग्रीन यांच्या प्रसिद्ध कादंबरी 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' मधून रूपांतरित करण्यात आले आहे आणि अभिनेता सैफ अली खान एका खास भूमिकेत दिसणार आहे.