मुंबई - क्रिकेट जगतात 'फिरकीचा जादूगार' शेन वॉर्नने जगाचा निरोप घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या महान क्रिकेटपटूचे गेल्या शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या बातमीने देश-विदेशातील शेन वॉर्नच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून आयपीएलपर्यंत शेन वॉर्नचा दबदबा होता. शेन वॉर्नने आयपीएलचे पहिले विजेतेपद (2008) जिंकून इतिहास रचला. शाहरुख खानने शेन वॉर्नच्या चेंडूवर चौकार मारला तेव्हाच्या आयपीएलच्या दिवसातील एका किस्सा आपण जाणून घेऊयात.
आपल्याला माहिती असेल की, भारतात 2008 मध्ये आयपीएलची सुरुवात झाली होती. त्यावेळी शेन वॉर्नने राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व केले. कर्णधार म्हणून पहिल्या आयपीएलमध्ये शेन वॉर्नच्या संघाने शाहरुख खानच्या संघ कोलकाता नाईट रायडर्सचा अंतिम फेरीत पराभव केला होता. या जेतेपदाचे नाव शेन वॉर्नच्या रेकॉर्डच्या यादीतही नोंदवले गेले.