मुंबई - हिंदी सिनेमाचा मूळ शोमन राज कपूर यांचा सर्वात धाकटा मुलगा राजीव कपूर यांचे मंगळवारी निधन झाले. हिंदी सिनेमाच्या पहिल्या कुटूंबाचा सदस्य असलेल्या राजीव कपूर यांनी अभिनयासह दिग्दर्शन आणि निर्मितीच्या क्षेत्रातही आपला हात आजमावला होता. आपली कारकीर्द अपेक्षेप्रमाणे पूर्ण होत नाही हे सत्य स्वीकारण्यात त्यांनी कधीही मागेपुढे पाहिले नव्हते.
बॉलिवूडमधील चिंपू या टोपण नावाने ओळखले जाणारे राजीव यांनी राज कपूर यांच्या १९८५ मधील ब्लॉकबस्टर राम तेरी गंगा मैली या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर त्यांनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शन आणि निर्मितीच्या क्षेत्रातही काम केले. आयुष्यात अनेक चढ उतार त्यांनी पाहिले होते.
आर के स्टुडिओच्या गणेश उत्सव प्रसंगी भाऊ रणधीर कपूरसोबत राजीव कपूर एका टॅब्लोइडशी बोलताना राजीव कपूर यांना एकदा विचारले गेले होते की, ८० च्या दशकातील चित्रपट विषयांचा तो बळी आहे का? यावर बोलताना त्यांनी सांगितले होते की एक अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीत आणि वैयक्तीक आयुष्यात खूप काही चुकले आहे.
राजीव कपूर एकदा म्हणाले होते की प्रत्येकजण मला शम्मी कपूरसारखे प्रोजेक्ट करायचा प्रयत्न करीत होते.
"माझ्या कारकिर्दीची बाब म्हणून, राम तेरी गंगा मैली हा मी केलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. इतर चित्रपटात चांगले काम करू शकलो नाही, परंतु सर्वच वाईट नव्हते. दुर्दैवाची बाब म्हणजे प्रत्येकालाच मला शम्मी कपूरसारखे प्रोजेक्ट करायचे होते, कारण प्रत्येकजण मला शम्मी कपूरसारखे प्रोजेक्ट करायचा प्रयत्न करीत होते. मी त्याच्यासारखा दिसत होता. साध्या भाषेत थोडक्यात सांगायचे तर - हिट असेल तर फिट असेल.जर तुमचे चित्रपट चांगले काम करत असत तर वेगळ्या टॅन्जेन्टवर काम केले जात असे. मी काही छान चित्रपट केले ज्यामध्ये चांगले संगीत होते, परंतु बऱ्याच चित्रपटात ते घडू शकले नाही., "असे मुलाखतीत राजीव म्हणाले होते.
राजीव कपूर ऋषी आणि रणधीरसोबत राजीव कपूर यांचे वयाच्या चाळीशीत लग्न झाले होते. त्यांची पत्नी आरती सभरवाल या आर्किटेक्ट होत्या. मात्र लग्नानंतर ते थोड्याच काळात पत्नीपासून वेगळे झाले. जेव्हा त्याला आरतीबद्दल विचारले असता राजीव कपूर म्हणाला होता, "हो, मी लग्न केले होते, पण हे दोन महिनेही टिकले नाही. त्यानंतर माझा घटस्फोट झाला, अविवाहित राहिलो, परंतु मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे. तथापि, आता माझ्यासोबत माझा पार्टनर आहे आणि मी आनंदी आहे. "
आशुतोष गोवारीकर यांच्या तुलसीदास ज्युनियर या चित्रपटातून पुन्हा एकदा चित्रपट क्षेत्रात कमबॅक करण्याची तयारी राजीव कपूर करीत होते. या चित्रपटाची घोषणा डिसेंबर २०२० मध्ये करण्यात आली होती. या चित्रपटात संजय दत्त मुख्य भूमिका साकारणार होता.
हेही वाचा - कपूर खानदानातील निखळला अजून एक तारा, चिंटू पाठोपाठ चिंपूनेही घेतला निरोप!