मुंबई- अभिनेता आयुष्मान खुराणाने चित्रपट आणि ब्रँड एन्डॉर्समेंटची निवडण्याच्या आपल्या पद्धतीचा खुलासा केला आहे. व्यक्तीगत पातळीवर आपले विचार जेव्हा लोकांच्यापर्यंत पोहोचवायचे असतात तेव्हा जबाबदारीची जाणीव होते असे आयुष्यमानने म्हटले आहे.
आयुष्मान म्हणाला, "जेव्हा मी माझे चित्रपट निवडतो, तेव्हा मी फक्त कथेकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. ही कथा अव्यवस्थेला तोडू शकेल का याचा विचार करतो, तसेच ही कथा फ्रेश आहे की नाही आणि लोकांचे चांगले मनोरंजन होईल का याचाही विचार करतो.''
हेही वाचा - अक्षय कुमार 'रामसेतु'चे आयोध्येत करणार शुटिंग
ते पुढे म्हणाले, “जेव्हा मी एखादा ब्रँड निवडतो तेव्हा मी खात्री करुन घेतो की त्यांना माझ्या माध्यमातून भारतीय लोकांना काणती कथा सांगायची आहे आणि कोणत्या नव्या पध्दतीने ते संदेश लोकांपर्यंत पोहोचवू इच्छितात.''