मुंबई- अभिनेत्री अंकिता लोखंडेला तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात भूमिकेसाठी तडजोड करण्यास सांगण्यात आले होते याचा खुलासा तिने केला आहे. कास्टिंग काऊचचा तिला सामना करावा लागला होता. यात एक मोठा अभिनेताही सहभागी होता, असे तिने सांगितलंय.
अंकिता म्हणाली की जेव्हा जेव्हा ती खूपच तरुण आणि इंडस्ट्रीमध्ये नवीन होती तेव्हा तिला भूमिकेच्या बदल्यात तडजोड करण्यास सांगण्यात आले होते. ''मी खूप स्मार्ट आहे, त्यावेळी १९-२० वर्षाची असताना खोलीत मी एकटीच होते. मी त्याला विचारले की कोणत्या प्रकारची तडजोड मी करावी असे तुमच्या निर्मात्याला वाटते? मला पार्टीला जावे लागेल की डिनरला?", असे अंकिताना एका वेब्लॉईडशी बोलताना म्हणाली.
''आणि तो मला पुढचे सांगणार तोपर्यंत मी त्याचा बँड वाजवला होता. मी त्याला म्हणाले, तुझ्या प्रोड्यूसरला झोपण्यासाठी मुलगी हवी आहे, त्याला काम करण्यासाठी टॅलेंटेड मुलगी नको आहे. आमि मी तिथून निघून गेले. त्यानंतर त्याने माझी माफी मागितली आणि म्हणाला की तुला सिनेमात घेण्यासाठी मी प्रयत्न करतो. पण मी म्हणाले, तू प्रयत्न केलास आणि मला सिनेमात घेतलेस तरी मी काम करणार नाही.'', असे ती पुढे म्हणाली.
हेही वाचा - पदार्पणच्या सिनेमात शनाया कपूरचा गुरफाते पीरजादा आणि लक्ष्या लालवाणीसोबत प्रेमाचा त्रिकोन