महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जॅकलिन फर्नांडिज आणि अक्षय कुमार यांच्यात काय साम्य आहे? - Jacqueline with Akshay Kumar in 'Bachchan Pandey'

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज यांच्यात साम्य आहे. दोघेही ‘मॉर्निंग पर्सन्स’ असून त्यांना पहाटे उठायला आवडते. त्यांच्यामते सकाळी सकाळी मिळणारी ऊर्जा दिवसभरातील कामासाठी उपयोगी पडते. जॅकलिन फर्नांडिज आणि अक्षय कुमार यांचे यामुळेच चांगले पटते.

Jacqueline Fernandez and Akshay Kumar
जॅकलिन फर्नांडिज आणि अक्षय कुमार

By

Published : Mar 1, 2021, 12:47 PM IST

मुंबई - शक्यतो दोन पुरुष किंवा दोन बायका यांच्यातील साम्य मोजता येते, परंतु, एक पुरुष आणि बाई मधील साम्य मोजता येईल? का नाही? नक्कीच मोजता येईल. उदाहरण द्यायचं झालं तर अक्षय आणि जॅकलिनचं उदाहरण घ्या. हो, अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज यांच्यात साम्य आहे. दोघेही ‘मॉर्निंग पर्सन्स’ असून त्यांना पहाटे उठायला आवडते. त्यांच्यामते सकाळी सकाळी मिळणारी ऊर्जा दिवसभरातील कामासाठी उपयोगी पडते. जॅकलिन फर्नांडिज आणि अक्षय कुमार यांचे यामुळेच चांगले पटते.

जॅकलिन फर्नांडिज
अक्षय कुमार सोबत जॅकलिन फर्नांडिज तिच्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अक्षयबरोबर यापूर्वी हाऊसफुल २, हाऊसफुल ३ आणि ब्रदर्स या चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री जॅकलिन अक्षय सोबत काम करायला उत्सुक असते कारण त्याच्या चित्रपटांचे शूटिंग नेहमीच सकाळी (इतरांच्या मते पहाटे) असते व काम करताना उस्फुर्तपणे ऊर्जा उत्पन्न होत असते. प्रॉडक्शनमधील स्त्रोत सांगते, "जॅकलिन आणि अक्षय या दोघांचीही पहाटे उठण्याची सवय सारखीच आहे. तसेच अक्षय सकाळी फिटनेस रुटीन करतो तर जॅकलिन योगाभ्यास. कधी कधी जॅकलिन सकाळी घोडसवारीसाठी रेस कोर्स वर पोहोचते तर कधी कधी अक्षय आपला व्यायाम समुद्रकिनारी करतो. जर का शूटिंगसाठी निघायचे नसेल तर जॅकलिन आपल्या आवडत्या कॉफीचे चुस्के घेत स्क्रिप्ट वाचन करते आणि अक्षय आपल्या ऑफिसमध्ये सकाळचं स्क्रिप्ट रिडींग ठेवतो. अक्षय आणि जॅकलिन या दोघांनाही सकाळ सर्वात प्रिय आहे.”
अभिनेता अक्षय कुमार
स्त्रोत पुढे म्हणते, "अक्षय नेहमीच शूटिंगची शिफ्ट सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान ठेवतो. खरंतर बॉलिवूड पार्टी लाईफ एन्जॉय करणाऱ्या कलाकारांना हे अन्यायकारक वाटते. अभिनेत्रींना तर हे अधिक जाचक वाटते कारण त्यांना शिफ्ट सुरु होण्याच्या दीड-दोन तास अगोदर पोहोचावे लागते, तयार होण्यासाठी. परंतु जॅकलिन ही कदाचित एकमेव हिरॉईन असेल जी अक्षय सोबत सकाळची शिफ्ट करायला कधीच कंटाळत नाही. पहाटेची योगासनं आणि आवडती कॉफी मिळाली की जॅकलिन सकाळी कितीही वाजताच्या शिफ्टला वेळेत हजर असते.”
जॅकलिन फर्नांडिज
जॅकलिन स्वत: शिस्तबद्ध आहे, तशीच तिचा ‘बच्चन पांडे’ हिरो अक्षय कुमार. जेव्हा शूटिंग नसते तेव्हा देखील ती लवकरच उठते आणि वाचन, भूमिकांचा अभ्यास, त्यासंदर्भातील नोट्स बनविणे आणि दिवसभरात किंवा आठवडाभरात करण्याच्या गोष्टींची नोंद करून ठेवते. तसेच घरातील लागणाऱ्या वस्तू, आपले डायटचे जिन्नस आदींचा ठोकताळा घेते. व्यस्त दिनचर्येत शिस्तबद्धता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे असे जॅकलिनचे मत आहे.
अभिनेता अक्षय कुमार
सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि यामी गौतम यांच्यासोबत ‘भूत पोलिस’ या हॉरर कॉमेडीच्या चित्रीकरणात ती व्यस्त होती आणि आता जैसलमेर मध्ये ‘बच्चन पांडे’ च्या. त्यानंतर जॅकलिन रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ च्या चित्रीकरणासाठी सज्ज होईल ज्यात तिची जोडी रणवीर सिंग सोबत आहे. इतके चित्रपट हातात असताना स्वतःला फिट ठेवणे आत्यंतिक गरजेचे आहे असे जॅकलिन मानते. तसेच सकाळी केलेला फिटनेस जास्त कामी येतो असेही ती मानते.
जॅकलिन फर्नांडिज आणि अक्षय कुमार
वय तर दररोज वाढतच असते परंतु हेल्दी लाइफस्टाइल अनुसरून आपले अंतर्बाह्य आरोग्य सांभाळणे आपल्याच हातात असते असे जॅकलिन फर्नांडिजचे ठाम मत आहे. ती स्वतः फिटनेस बाबत जागरूक असते व आपला मित्र अक्षय कुमारला ‘फिटनेस गुरु’ मानते आणि या साम्यतांमुळेच ती आणि अक्षय कुमार यांचे विलक्षण ‘बॉण्डिंग’ दृष्ट लागण्यासारखे आहे असे म्हणावे लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details