मुंबई- करण जोहरच्या 'स्टूडंट ऑफ द ईअर' चित्रपटाने तीन नव्या चेहऱ्यांना ओळख मिळवून दिली. महेश भट्ट यांची मुलगी आलिया, डेविड धवन यांचा मुलगा वरूण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा सिनेमा हीट ठरला आणि तिन्ही कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
वरुण म्हणतोय, ७ वर्षांपूर्वी याच दिवसाने माझं आयुष्य बदललं - हीट
७ वर्षांपूर्वी याच दिवशी माझं आयुष्य बदललं असं म्हणत त्याने एक ट्विट रिट्विट केलं आहे. हे ट्विट २०१२ मधील असून स्टूडंट ऑफ द ईअर चित्रपटात वरूण धवनची वर्णी लागली असल्याचं यात म्हटलं आहे.
आता वरुणने याच चित्रपटासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. ७ वर्षांपूर्वी याच दिवशी माझं आयुष्य बदललं असं म्हणत त्याने एक ट्विट रिट्विट केलं आहे. हे ट्विट २०१२ मधील असून स्टूडंट ऑफ द ईअर चित्रपटात वरूण धवनची वर्णी लागली असल्याचं यात म्हटलं आहे.
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्टूडंट ऑफ द ईअर' चित्रपटाला प्रेक्षकांची उत्तम पसंती मिळाली होती. या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर चित्रपटाचा दुसरा भागही प्रदर्शित करण्यात आला. यात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला