मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि मुलगा अहान शेट्टी दोघेही आपआपल्या प्रिय व्यक्तीसोबत रिलेशनसीपमध्ये आहेत. दोघेही यावर्षी विवाबंधनात अडकणार अशी बातमी आहे.
मिलालेल्या बातमीनुसार भाऊ-बहीणींची ही जोडी 2022 मध्ये लग्न करणार आहे. अथिया आणि क्रिकेटर केएल राहुलच्या नात्याला दोन्ही कुटुंबांची मान्यता आहे. या वर्षी हे जोडपे लग्नाच्या बंधनात अडकण्याची शक्यता आहे. दरम्यान अहान शेट्टी हा दीर्घकाळापासूनची गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबत रिलेशनमध्ये आहे. तोही यंदा विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा आहे.
अथिया आणि केएल राहुलने गेल्या नोव्हेंबरमध्ये एका सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांचे प्रिय नाते अधिकृत केले. त्याप्रसंगाच्या एका महिन्यानंतर अहान शेट्टीचा पहिला चित्रपट तडपच्या स्क्रिनिंगदरम्यान लव्हबर्ड्स पहिल्यांदा रेड कार्पेटवर दिसले होते.
गो या शब्दापासूनच अहान शेट्टी त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल बोलला आहे. तडप चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने तानियाचे त्याच्या प्रवासात साथ दिल्याबद्दल कौतुक केले आणि सांगितले की ती त्याच्या आयुष्यातील सर्वात मजबूत स्तंभांपैकी एक आहे.
तानियाबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला, "मी सांगतो की ती माझ्या शक्तीचा एक आधारस्तंभ आहे. मी माझी आई, माझी बहीण आणि तानियाबद्दल सांगतो की, त्या तिघी माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाच्या महिला आहेत. मी त्यांचा खूप आभारी आहे. ते तिघेही माझ्यासोबत आहेत. त्या तिघी नसत्या तर मी आज इथे असतो असे वाटत नाही.
कामाच्या आघाडीवर, अहान शेट्टी आगामी अक्षय कुमारसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला करणार आहेत. त्यांनी अहानच्या लाँचपॅड 'तडप'ची बँकरोलही केली होती. अथिया अखेरची नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'मोतीचूर चकनाचूर'मध्ये दिसली होती.
हेही वाचा -सलमान खानच्या पोस्टमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का