महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

घुंघट घालून आपल्याच लग्नात 'नाच मेरी लैला' गाण्यावर नाचली नेहा कक्कर - Famous Bollywood singer Neha Kakkar

गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रित सिंग यांचा विवाह मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला आहे. त्यानंतर नेहा 'नाच मेरी लैला' गाण्यावर घुंघट परिधान करुन नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Neha Kakkar
नेहा कक्कर

By

Published : Oct 27, 2020, 12:59 PM IST

नवी दिल्ली - बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांनी विवाहगाठ बांधली आहे. अलीकडेच नेहा कक्कर आणि रोहनप्रित यांनी अचानक लग्न करून आपल्या चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले. नेहा आणि रोहनप्रित सिंग यांच्या लग्नाचे व्हिडिओ इंटरनेटवरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये नेहा कक्कर घुंघट घालून 'नाच मेरी लैला' गाण्यावर नाचताना दिसली आहे.

नेहा कक्कर हिने तिच्या तोंडावर लाल घुंघट घातलेला आहे, त्याचवेळी व्हिडिओमध्ये टोनी कक्कर आणि रोहनप्रित हे दोघेही तिच्यासोबत दिसत आहेत. नेहा आणि रोहनप्रित यांच्या या व्हिडिओवर चाहते खूप कमेंट करत आहेत आणि आपला अभिप्राय देत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, नेहा आणि रोहनप्रित सिंगच्या लग्नात केवळ कुटुंब आणि खास मित्रच सामील झाले होते. लग्नानंतर दोघंही पंजाबमध्ये रिसेप्शन देणार आहेत. लग्नाआधी नेहा कक्कर हिच्या मेहंदी आणि हळदी समारंभांशी संबंधित व्हिडिओंचीही बरीच चर्चा होती. अलीकडेच नेहा कक्कर आणि रोहनप्रितसिंग यांचे ''नेहू दा व्याह'' हे गाणे देखील रिलीज झाले होते. या हिट गाण्यात ते पहिल्यांदाच एकत्र झळकले. हे गाणे प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details