मुंबई- आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या भूमिका असलेल्या ‘बाला’ चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. भूमीने म्हटलंय की तिला निश्चितपणे चांगल्या सिनेमांचा वारसा मागे सोडायचा आहे. अमर कौशिक दिग्दर्शित 'बाला' हा चित्रपट एका व्यक्तीच्या भोवती फिरत आहे, ज्याला अकाली टक्कल पडल्यामुळे सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागतो.
हेही वाचा - शिल्पा शेट्टीने मारला 'वडापाव'वर ताव
या चित्रपटाविषयी बोलताना भूमीने लिहिले की, "बाला हा एक खास चित्रपट आहे. ज्यामध्ये मला दमदार भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.''
हेही वाचा - 'लक्ष्मी' चित्रपटाचे तृतीयपंथीयांसाठी दिल्लीत स्पेशल स्क्रिनिंग; लक्ष्मी नारायण त्रिपाठींची उपस्थिती
बाला हा चित्रपट भूमी आणि आयुष्मान यांनी एकत्र काम केलेला तिसरा चित्रपट होता. या अगोदर दोघांनीही 'दम लगाके हैयशा', 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटात एकत्र काम केले होते.