कलात्मक स्वातंत्र्याच्या (artistic liberty) व्याप्तीबाबत नेहमीच वाद विवाद होत आले आहेत. एका इटालियन समकालीन कलाकाराने आपली ‘अदृश्य’ निर्मिती तब्बल $१८,३०० डॉलर्स किंमतीला विकल्यानंतर सोशल मीडियावर वादळ निर्माण झाले आहे. एका कलाकाराने या मोठ्या प्रमाणावर ‘काहीच’ विकले नाही याबद्दल जग हैराण झाले असताना, एका देसी माणसाने असा दावा केला की आम्ही भारतीयांनी २००७ मध्येच हा चमत्कार केला होता.
२००० च्या दशकाच्या सुरुवातीस रिलीज झालेल्या धमाल चित्रपटाचा संदर्भ घेऊन अर्शद वारसी, जावेद जाफरी, रितेश देशमुख आणि आशिष चौधरी यांचा सिनेमातील एक सीन ट्विमध्ये वापरण्यात आलाय. यामध्ये २० हजार रुपयांना कसे रिकामे कॅनव्हॉस त्याच्या जुगाड टॅलेंटने मार्केटिंग करुन विकले होते हे सप्रमाण दाखवून दिलंय.
“इटालियन शिल्पकाराने १८००० डॉलर्समध्ये काहीही नसलेले शिल्प विकल्याबद्दलची बातमीत काय आहे? आमच्या पोरांनी असे काम या अगोदरच २००७ मध्ये अशाच प्रकारे काम केले होते! ” असे त्या व्यक्तीने मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर आयकॉनिक सीनचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
या सीनमध्ये अर्शद वारसी, जावेद जाफरी, रितेश देशमुख आशिष चौधरी हे मिळून रिकामे कॅनव्हास २० हजार रुपयांना विकतात. जेव्हा या कॅनव्हॉसवर काहीच पेंटिंग नाही हे लक्षात येताच ते म्हणतात, की 'हे पेटिंग घोडा चारा खातानाचे आहे'. यावर तो म्हणतो, 'मग चारा कुठे आहे?'. तर ते म्हणतात, 'चारा घोड्याने खाल्ला'. मग तो विचारतो, की ,मग घोडा कुठं आहे?', त्यावर ते म्हणतात की चारा खाल्यानंतर घोडा निघून गेला.