महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कियारा अन् विजय देवरकोंडा मुंबईच्या फिल्मालय स्टूडिओमध्ये स्पॉट, हे आहे कारण - मिंट ग्रीन शेरवानी

यावेळी कियारा गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये तर विजय मिंट ग्रीन रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला. हे दोघेही मेबाज यांच्या इथनिक वेअरच्या ऑनलाईन शॉपिंगसाठी जाहिराताचे चित्रीकरण करण्यासाठी आले असल्याचं म्हटलं जात आहे.

कियारा अन् विजय फिल्मालय स्टूडिओमध्ये स्पॉट

By

Published : Sep 9, 2019, 7:23 PM IST

मुंबई- अभिनेत्री कियारा अडवाणी कबीर सिंगमधील आपल्या भूमिकेमुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. अशात आता ती मुंबईमध्ये दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत स्पॉट झाली. मिळालेल्या माहितीनुसार हे दोघं एका कमर्शियल शूटसाठी याठिकाणी आले होते.

यावेळी कियारा गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये तर विजय मिंट ग्रीन रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला. हे दोघेही मेबाज यांच्या इथनिक वेअरच्या ऑनलाईन शॉपिंगसाठी जाहिराताचे चित्रीकरण करण्यासाठी आले असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या जोडीला एकत्र पाहणं त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच खास असणार आहे.

कियारा अन् विजय फिल्मालय स्टूडिओमध्ये स्पॉट

चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, २०१६ मध्ये आलेल्या एम.एस.धोनी सिनेमातील आपल्या भूमिकेमुळे कियारा चर्चेत आली. यानंतर लस्ट स्टोरीज आणि कबीर सिंगमधील तिच्या भूमिकाही विशेष गाजल्या. लवकरच ती शेरशाह सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ती सिद्धार्थ मल्होत्राच्या अपोझिट झळकणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details