शाहरुख खान आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट आजही लोकप्रिय आहे. यातील त्यांच्या भूमिकेची कॉपी अजूनतरी कोणी केलेली नाही. पण हे धाडस केनीयाच्या जोडीने करुन दाखवलंय.
पाहा, केनीयाच्या 'शाहरुख-काजोल'चा व्हायरल व्हिडिओ - News in Marathi
'तुझे देखा तो यह जाना सनम' या गाजलेल्या गाण्यावर आजपर्यंत असंख्य प्रेमिकांनी नृत्य केलंय, अभिनय केलाय. परंतु, केनीयाच्या एका जोडीने केलेला हा व्हिडिओ व्हायरल झालाय.

'तुझे देखा तो यह जाना सनम' या गाजलेल्या गाण्यावर आजपर्यंत असंख्य प्रेमिकांनी नृत्य केलंय, अभिनय केलाय. परंतु, केनीयाच्या एका जोडीने केलेला हा व्हिडिओ व्हायरल झालाय. अभिनेता अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
अनुपम यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. ट्विटरवर शेअर करीत अनुपम खेर यांनी लिहिलंय, ''सादर आहे केनीयाच्या शाहरुख आणि काजोलचे प्रेम गीत. हा व्हिडिओ गाणे तयार करणाऱ्या ललित पंडित यांनी शेअर केलाय.'' काही वेळ पूर्वीच शेअर केलेल्या या व्हिडिओला ६५ हजाराहून अधिक व्ह्यूवज मिळाले आहेत.