महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जिममध्ये घाम गाळणाऱ्या या सुंदर अभिनेत्रीला ओळखलंत? - Tiger Shroff friend Disha Patani

बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्याला फिटनेससाठी खूप कष्ट घेत असतात. अभिनेत्री दिशा पटाणी नेहमीच आपल्या जीमचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करीत असते.आता तिने एक जबरदस्त जिम व्हिडिओ टाकला आहे.

अभिनेत्री दिशा पटाणी
अभिनेत्री दिशा पटाणी

By

Published : Mar 17, 2022, 3:54 PM IST

मुंबई - बहुतेक सर्वच बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्याला फिटनेससाठी खूप कष्ट घेत असतात. अभिनेत्री दिशा पटाणी नेहमीच आपल्या जीमचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करीत असते.आता तिने एक जबरदस्त जिम व्हिडिओ टाकला आहे. इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या क्लिपमध्ये आपण तिला पिवळ्या रंगाच्या शॉर्ट्स आणि स्ट्रॅपी बॅकलेस फिटनेस गियर घातलेले पाहू शकतो. यात ती खूप सहजतेने व्यायाम करते आहे. कॅप्शनसाठी दिशाने वेटलिफ्टिंग इमोजी वापरले आहे. फायर आणि रेड हार्ट आय इमोजीसह चाहत्यांनी सोशल मीडिया तिचे कौतुक केले आहे.

दिशा पटाणी तिच्या फिटनेस रुटीनबद्दल खूप खास आहे आणि तिचा “ट्रिपल किक” व्हिडिओ पुरावा आहे. दिशाचा ‘बेस्ट फ्रेंड’ टायगर श्रॉफसुद्धा फोटोखाली कमेंट टाकण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. त्याने फायर इमोजीसह “क्लीअर एएफ” असे लिहिले आहे.

दिशा पटानीचे जीममधील व्हिडिओ आणि फोटो वर्कआउटसाठी प्रेरणा वाढवण्याचे काम करतात. एकदा तिने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ती जॉ-ड्रॉपिंग रॅक पुल सेशन करत आहे. “रॅक पुल 5 रिप्स 80 किलो,” असे तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते. टायगर श्रॉफने तिला ‘वंडर वुमन’ म्हटले होते त्याची बहीण कृष्णा श्रॉफने, “तू आग आहेस.” असे लिहून दिशाचे कौतुक केले होते.

दिशा पटानी अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया यांच्यासोबत 'एक विलियन २' या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा -Hiropanti 2 Trailer: बहुप्रतीक्षित हिरोपंती २ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details