मुंबई- बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीनं नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो बॉक्सिंग करताना दिसत आहे. इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये सिद्धांत शर्टलेस असून त्यानं बास्केटबॉल शॉर्ट्स आणि ग्लव्हज घातले आहेत. यात तो आक्रमकपणे पंचिंग बॅगकडे जाताना दिसत आहे.
व्हिडिओला सिद्धांतनं कॅप्शन दिलं आहे, बीट इट. या व्हिडिओला काही तासातच अनेक लाईक मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने आपले धूप गाणे शेअर केले होते. या गाण्याला 2 लाख 19 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
एका माध्यमाशी बोलताना सिद्धांतनं सांगितलं, की धूप या गाण्याद्वारे मला एक गायक म्हणून ओळख मिळवायची नाही. तर, लॉकडाऊनदरम्यान लोकांना आशा आणि आनंद देण्याचा या गाण्याचा उद्देश आहे. गली बॉय सिनेमात झळकलेला सिद्धांत लवकरच यश राज फिल्मसच्या बंटी और बबली 2 या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बंटी और बबली 2 सिनेमात सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. 2005 साली आलेल्या बंटी और बबली सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका होत्या.