मुंबई- शमिता शेट्टीच्या वाढदिवशी तिची बिग बॉस 15 मधील सहकारी स्पर्धक आणि गायिका नेहा भसीनने प्रियकर राकेश बापटसोबत तिची डेट नाईट क्रॅश केली. शमिताला तिच्या वाढदिवशी शुभेच्छा देताना नेहाने इंस्टाग्रामवर एक आनंददायक व्हिडिओ शेअर केला आहे. शमिता आणि राकेश बापट या लव्हबर्ड्सच्या वैयक्तिक वेळेत तिने व्यत्यय आणल्याचे दिसत आहे.
ती आणि शमिता भरपूर हसत असतानाचा हा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रमवर शेअर केला आहे.
बिग बॉस ओटीटीमध्ये एकत्र राहात असताना शमिता आणि नेहा चांगले यांची चांगले जुळले. शो दरम्यान दोघीही कठीण प्रसंगात एकमेकींच्या पाठीशी उभ्या राहिल्या. शमिताला बिग बॉस 15 चे तिकीट मिळाले होते, तर नेहा सीझनमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दिसली होती.