मुंबई - करण जोहरची निर्मिती असलेल्या 'कलंक' चित्रपटाचे पहिले गाणे 'घर मोरे परदेसीयां' हे काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले होते. या गाण्याला सोशल मीडियावर चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. आत्तापर्यंत या गाण्याला करोडो व्हिव्ज मिळाले आहेत. आता या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ समोर आला आहे.
'घर मोहे परदेसीया' गाण्याच्या कंन्सेप्ट पासून तर यातील भव्यदिव्य सेट्सपर्यंत कशाप्रकारे मेहनत घेण्यात आली होती, हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. माधुरी दिक्षित, आलिया भट्ट आणि वरूण धवन यांनीदेखील या गाण्याचा प्रवास या व्हिडिओत उलगडला आहे.
आलियाने या गाण्यासाठी पहिल्यांदाच 'कथ्थक' नृत्य केले आहे. माधुरी दिक्षित सोबतची तिची जुगलबंदी या गाण्यात पाहायला मिळाली. श्रेया घोषाल आणि वैशाली माडे यांनी या गाण्यावर स्वरसाज चढवला आहे. अभिजीत भट्टाचार्य यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर, प्रितम यांनी संगीत दिले आहे.
रेमो डिसूजा याने या गाण्याला कोरियोग्राफ केले आहे. अलिकडेच या चित्रपटातील 'फर्स्ट क्लास है' हे गाणे देखील प्रदर्शित झाले आहे. या गाण्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरविषयी चाहत्यामध्ये उत्कंठा पाहायला मिळतेय. लवकरच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होईल.