मुंबई- अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा आपल्या भावना कवितेतून व्यक्त केल्या आहेत. तिने आसमान ही कविता सोशल मीडियावर शेअर केली आहे.
कंगनाने आपल्या आवाजात ही कविता सादर केली आहे. कंगनाच्या टीमने हा व्हिडिओ शेअर केलाय. ही कविता कंगनाने लिहिली असून याचे दिग्दर्शनही तिनेच केल्याचे टीमने म्हटलंय.
कंगना रनौत सध्या लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबासमवेत मनाली येथे वेळ घालवत आहे. व्हिडिओमध्ये ती मनालीच्या भागात फिरुन आपले विचार कवितेतून मांडताना दिसत आहे. तिने हा व्हिडिओ आपल्या घरातील वेगवेगळ्या जागांचा उपयोग करीत विना मेकअप सादर केलाय.
या अगोदर तिने एक सुंदर कविता आपल्या आईसाठी लिहिली होती. मदर्स डेला तिने ही कविता समर्पित केली होती.