मुंबई - विद्या बालन आणि अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका असलेला 'मिशन मंगल' चित्रपट स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झाला. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगलंच यश मिळताना दिसत आहे. अशात विद्यानं नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत या चित्रपटातील अक्षयच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे.
'मिशन मंगल'मध्ये अक्षयची भूमिका गरजेची होती का? विद्या म्हणते, नाही
मुलाखतीत विद्याला प्रश्न विचारला गेला, की या सिनेमात अक्षयचं पात्र गरजेचं होतं का? यावर विद्या म्हणाली, या सिनेमात ते पात्र फारसं गरजेचं नसलं, तरी अक्षयचं या चित्रपटात असणं चित्रपटासाठी फायद्याचं ठरलं.
मुलाखतीत विद्याला प्रश्न विचारला गेला, की या सिनेमात अक्षयचं पात्र गरजेचं होतं का? यावर विद्या म्हणाली, या सिनेमात ते पात्र फारसं गरजेचं नसलं, तरी अक्षयचं या चित्रपटात असणं चित्रपटासाठी फायद्याचं ठरलं. अक्षयचे अनेक चाहते असल्यानं चित्रपटाच्या कलेक्शनला याचा फायदा झाल्याचं विद्या यावेळी म्हणाली.
या सिनेमात विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, किर्ती कुल्हारी आणि नित्या मेनन या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित या चित्रपटानं आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर अवघ्या चार दिवसांत ९७.५६ कोटींची कमाई केली आहे.