महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 3, 2019, 9:15 PM IST

ETV Bharat / sitara

बॉलिवूडचे सर्व विक्रम मागे टाकत 'वॉर' सिनेमाने रचला नवा इतिहास

वॉर चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५३. ३५ कोटींची कमाई करत आजपर्यंतचे कमाईचे सर्व विक्रम मागे टाकले आहेत. राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी इतकी कमाई करणाराही हा पहिलाच चित्रपट ठरलाय.

'वॉर' सिनेमाने रचला नवा इतिहास


मुंबई - ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या 'वॉर' चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड उचलून धरले आहे. जबरदस्त अॅक्शन आणि खतरनाक स्टंट्स असलेल्या या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये इतिहास रचला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५३. ३५ कोटींची कमाई चित्रपटाने करत आजपर्यंतचे कमाईचे सर्व विक्रम मागे टाकले आहेत. हा चित्रपट हिंदीसह तेलुगु आणि तामिळ भाषेतही रिलीज करण्यात आला आहे.

ह्रतिक आणि टायगर या दोघांचाही सर्वाधिक कमाईचा हा पहिलाच चित्रपट ठरलाय. अमिताभ आणि आमिरच्या 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान'ने पहिल्याच दिवशी ५२. २५ कोटींची कमाई करत विक्रम केला होता. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांनी नाकारला होता. वॉर चित्रपटाला मात्र प्रेक्षकांनी स्वीकारल्याचे चित्र देशभर पाहायला मिळाले. वॉर चित्रपटाने हिंदीत ५१.६० कोटींची कमाई केली. तर तामिळ आणि तेलुगुमध्ये चित्रपटाने १. ७५ कोटींची कमाई केली. भारतात एकूण ५३. ३५ कोटींची कमाई केल्याने बॉलिवूडचा हा सर्वाधिक कमाई पहिल्या दिवशी करणार चित्रपट ठरला आहे.

वॉर हा चित्रपट २ ऑक्टेबरला गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे सुट्टीच्या दिवशी रिलीज झालाय. पहिल्या आठवड्याची कमाई करण्यासाठी चित्रपटाला पुरेपुर ५ दिवस मिळालेत. शनिवार रविवारची सुट्टी आणि विकेंडमुळे चित्रपट पहिल्या आठवड्याच्या कमाईतही विक्रम स्थापन करु शकतो. राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी इतकी कमाई करणाराही हा पहिलाच चित्रपट ठरलाय.

वॉर हा चित्रपट ह्रतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि यशराज फिल्म्ससाठी वरदान ठरलाय. त्यांच्या करियरमधील हा चित्रपट सर्वाधिक हायेस्ट ओपनर ठरला आहे.

वॉर चित्रपटाला दाक्षिणात्य सैरा नरसिम्हा रेड्डी या चिरंजीवीच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर मुकाबला होता. तसेच हॉलिवूडच्या जोकर या चित्रपटाशीही सामना होता. मात्र या सगळ्याशी यशस्वी युध्द करण्यात वॉर यशस्वी ठरलाय.

पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूडच्या या चित्रपटांना वॉरने मागे टाकलंय. आजपर्यंत सर्वाधिक कमाई करणारे अलिकडे रिलीज झालेले चित्रपट होते..सलमान खानचा भारत (४२.३० कोटी ), मिशन मंगल (२९.१६ कोटी ), साहो (हिंदी) (२४.४० कोटी ) आणि कलंक (२१.६० कोटी) .

वॉर हा चित्रपट भारतात ४००० स्क्रिन्स ( हिंदी, तामिळ तेलुगुसह ) आणि परदेशात १३५० स्क्रिन्सवर रिलीज झालाय. या चित्रपटाने ऑस्ट्रेलियात धमाल उडवून दिली आहे. २०१९ चा हायेस्ट ओपनर बॉलिवूड चित्रपट बनलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details