महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आयुष्यमानचा 'बाला' पाहून अक्षयु कुमारने दिली अशी प्रतिक्रिया - Akshay kumar latest news

आयुष्यमानचा बाला चित्रपट पाहून अक्षय कुमारने आपली प्रतिक्रिया दिली आहे. आयुष्यमानचे कौतुक करताना त्याने कोणतीही कसूर सोडलेली नाही.

बाला

By

Published : Nov 11, 2019, 3:49 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने 'हाऊसफुल ४' या चित्रपटात 'बाला' ही व्यक्तीरेखा साकारली आहे. सध्या 'बाला' हा आयुष्यमान खुराणाचा नवा चित्रपट चर्चेत आहे. त्यामुळे हे दोन्ही अभिनेते ऑनलाईन क्रॉसस्टॉकमध्ये गुंतले होते. अक्षय कुमारने ट्विटरवरुन कळवले की, ''आयुष्यमानचा 'बाला' चित्रपट पाहण्यासाठी जात आहे.''

लगेचच आयुष्यमानने अक्षय कुमारला 'रियल किंग' म्हणण्यात वेळ दवडला नाही. आयुष्यमान लिहितो, ''अक्षय पाजी, एक प्रेरणा बनण्यासाठी धन्यवाद. रियल किंग..बालाचे आभार.''

चित्रपट पाहून झाल्यानंतर अक्षयने ताबडतोब ट्विट करीत लिहिले, ''सिनेमा पाहून झाला आणि पूर्ण सन्मानाने माझ्या डोक्यावरील ताज मी तुमच्या हवाली करीत आहे.'' अशा प्रकारे एका 'बाला'ने दुसऱ्या 'बाला'कडे ताज सोपवला आहे.

अक्षयच्या या ट्विटला उत्तर देताना आयुष्यमानने लिहिलंय, ''तुमचं मन खूप मोठं आहे, पाजी. म्हणूनच तुम्ही इतके मोठे स्टार आहात. धन्यवाद.''

'बाला' शुक्रवारी रिलीज झाला. यात यामी गौतम आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details