मुंबई- सुप्रसिद्ध संगितकार वाजिद खान यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन झाल्याने खळबळ उडाली होती. त्यांच्या निधनानंतर उलटसुलट चर्चेला पेव फुटले होते. मात्र शुक्रवारी त्यांच्या कुटुंबीयांनी एक पत्रक काढत त्यांच्या निधना बाबत स्पष्टीकरण दिले आहे. या पत्रकात वाजिद यांचे निधन हृदयविकाराने झाल्याचा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे वाजिद यांच्या निधनाबाबत होणाऱ्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.
संगितकार वाजिद खान यांचे निधन हृदयविकाराने, कुटुंबीयांनी केले स्पष्ट - वाजिद खान निधन वृत्त
सुप्रसिद्ध संगितकार वाजिद खान यांचे मुंबईत १ जूनला निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर कुटूंबीयांनी एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकात त्यांनी वाजिद यांचे निधन हृदयविकाराने झाल्याचे नमूद केले आहे. वाजिद यांचे निधन कोरोनाने झाले असल्याची चर्चा होती. त्याला आता पुर्णविराम मिळाला आहे.
![संगितकार वाजिद खान यांचे निधन हृदयविकाराने, कुटुंबीयांनी केले स्पष्ट arrest](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7496681-241-7496681-1591404238281.jpg)
वाजिद खान
वाजिद यांच्या कुटुंबीयांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे, की आमच्या प्रिय वाजिदचे निधन १ जूनला वयाच्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराने झाले आहे. मागच्या वर्षी त्यांच्या किडणीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या गळ्याच्या संक्रमणाचा उपचार सुरू होता.
या पत्रकात वाजिद यांच्या कुटुंबीयांनी डॉ. प्रिंस सुराणा यांचे आभार व्यक्त करुन त्यांनी आपल्या भावासारखीच वाजिदची काळजी घेतल्याचे नमूद केले आहे.