मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहलीची जोडी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर बर्याचदा दोघांचे क्यूट फोटो पाहिले जातात. सध्या त्यांचे काही जुने फोटो इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहेत. क्रिकेटर झहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या लग्नातील त्यांचा हा फोटो सध्या चर्चेत आहे. या फोटोमध्ये विराट आपली पत्नी अनुष्का शर्माचा स्कार्फ खेचताना दिसत आहे. फोटोमध्ये दोघेही रोमँटिक मूडमध्ये असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा हा सुंदर रोमँटिक फोटो विराट अनुष्काच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या फोटोंमध्ये विराट कोहली मिश्किल मूडमध्ये दिसत आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोंवर लाखो लाईक्स आल्या आहेत.