मुंबई - विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या स्वीत्झर्लँडमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहेत. दरम्यान त्यांची भेट अभिनेता वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल यांच्यासोबत झाली.
या जोडप्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात चारही सेलेब्रिटी बर्फाळलेल्या पहाडांमध्ये आनंदाने पोज देताना दिसत आहेत.
अनुष्काने हा फोटो शेअर करीत आपल्यासोबत वरुण आणि नताशा दलाल असल्याचे लिहिलंय. तर वरुणने आपल्या कॅप्शनमध्ये 'माऊंटनचे मित्र' असे लिहित विराट आणि अनुष्काचा उल्लेख केलाय.