कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी ‘विरुष्का’ ची २ कोटींची मदत! - virat anushka
यावर्षी आलेली कोरोना महामारीची दुसरी लाट महाभयंकर रूप घेतेय. भारतामध्ये दररोज चार लाखांच्या घरात रुग्णसंख्या वाढतेय. केंद्र आणि राज्य सरकारे सर्वतोपरी त्याचा मुकाबला करताहेत परंतु हीच वेळ आहे सर्वांनी देशासाठी काही करण्याची. मनोरंजनसृष्टीतील अनेक मान्यवरांनी मदतीचा हात पुढे केला आहे. खेळजगतातील विराट कोहली आणि मनोरंजनविश्वातील अनुष्का शर्मा म्हणजेच सर्वांच्या लाडक्या विरुष्काने कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी २ कोटींची मदत देऊ केली आहे.
विराट अनुष्काची मदत
मुंबई -यावर्षी आलेली कोरोना महामारीची दुसरी लाट महाभयंकर रूप घेतेय. भारतामध्ये दररोज चार लाखांच्या घरात रुग्णसंख्या वाढतेय. केंद्र आणि राज्य सरकारे सर्वतोपरी त्याचा मुकाबला करताहेत परंतु हीच वेळ आहे सर्वांनी देशासाठी काही करण्याची. मनोरंजनसृष्टीतील अनेक मान्यवरांनी मदतीचा हात पुढे केला आहे. खेळजगतातील विराट कोहली आणि मनोरंजनविश्वातील अनुष्का शर्मा म्हणजेच सर्वांच्या लाडक्या विरुष्काने कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी २ कोटींची मदत देऊ केली आहे.