मुंबई- अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खानची जोडी गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच चर्चेत आहे. हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे वृत्त समोर येत असतानाच अनेकदा त्यांना एकत्र स्पॉटदेखील केलं गेलं आहे. अशात नुकतीच ही जोडी मुंबईतील एका हॉस्पिटलबाहेर स्पॉट झाली.
मुंबईतील हॉस्पिटलबाहेर स्पॉट झाले सारा-कार्तिक, हे आहे कारण - आजारी
नुकतीच ही जोडी मुंबईतील एका हॉस्पिटलबाहेर स्पॉट झाली.त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहतेही हॉस्पिटलमध्ये जाण्याचं कारण जाणून घेण्यासाठी उत्सुक होते
त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहतेही हॉस्पिटलमध्ये जाण्याचं कारण जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. सारा कार्तिकच्या वडिलांची भेट घेण्यासाठी रुग्ण्लयात गेली होते. कार्तिकचे वडील गेल्या काही दिवसांपासून आजारी असून ते सध्या अॅडमिट आहेत.
सारा आणि कार्तिक लवकरच इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. हा सिनेमा लव आज कल चित्रपटाचा सिक्वल असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वीच सारा आणि कार्तिकनं या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं.