महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

चित्रीकरण पूर्ण होताच सेटवर रडायला लागला कार्तिक, शेअर केली पोस्ट

कार्तिकचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांना घट्ट मिठी मारून रडताना दिसत आहे.

चित्रीकरण पूर्ण होताच सेटवर रडायला लागला कार्तिक

By

Published : Jul 3, 2019, 10:12 AM IST

मुंबई- कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यांच्या या चित्रपटाचं शीर्षक अद्याप निश्चित झालं नसून नुकतंच चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सारा आणि कार्तिकनं आपल्या सोशल मीडियावरून सेटवरील काही फोटो शेअर केले असून दोघेही भावूक झाले आहेत.

अशात कार्तिकचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांना घट्ट मिठी मारून रडताना दिसत आहे. “जेव्हा वीरा म्हणते, हा रस्ता खूप छान आहे. माझी इच्छा आहे, की हा रस्ता कधी संपूच नये.” अगदी असंच इम्तियाज अलींसोबत शूट करताना वाटते’, अशी पोस्ट कार्तिकने शेअर केली आहे.

यासोबतच त्याने या चित्रपटासाठी साराहून अधिक उत्तम सहकलाकार कोणी असूच शकत नव्हतं. तिच्यासोबत पुन्हा पुन्हा काम करण्याची इच्छा असल्याचे म्हणत तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डादेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. २०२० मध्ये १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details