मुंबई- चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे 'स्टूडंट ऑफ द ईअर' चित्रपटानंतर आता आणखी एका चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. 'पती पत्नी और वो' असं शीर्षक असलेल्या या चित्रपटात ती झळकणार असून या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती काही दिवसांपूर्वीच लखनौला रवाना झाली आहे. आता या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ समोर आला आहे.
VIDEO: 'पती पत्नी और वो'च्या सेटवरील अनन्या, अपारशक्तीचा व्हिडिओ व्हायरल - pati patni aur wo
या व्हिडिओमध्ये अनन्याची झलक पाहायला मिळत असून तिने पिवळ्या रंगाचा टॉप घातला आहे. तर हातामध्ये बॅग असून तिच्या आजूबाजूला चित्रपटाची इतर टीम दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये अनन्याची झलक पाहायला मिळत असून तिने पिवळ्या रंगाचा टॉप घातला आहे. तर हातामध्ये बॅग असून तिच्या आजूबाजूला चित्रपटाची इतर टीम दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपारशक्ती खुराणा पाहायला मिळत आहे. तोदेखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाच्या एका क्रू मेंबरकडून तो आपला सीन समजून घेताना दिसत आहे, तर त्याच्या हातात चित्रपटाची स्क्रीप्ट आहे.
दरम्यान 'पती पत्नी और वो' चित्रपटात अनन्याशिवाय कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट १९७८ मध्ये आलेल्या 'पती पत्नी और वो' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. येत्या ६ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.