महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कर्करोगाशी लढा देणाऱ्या संजय दत्तची प्रकृती ढासळली, फॅन्स चिंतित - संजय दत्त कर्करोग

फुफ्फसाच्या कर्करोगाशी लढा देणाऱ्या संजय दत्तची प्रकृती ढासळली असून सोशल मीडियावर त्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये संजय दत्तची प्रकृती ढासळलेली दिसत आहे.

Sanjay Dutt
संजय दत्तचा व्हायरल फोटो

By

Published : Oct 4, 2020, 5:40 PM IST

मुंबई- अभिनेता संजय दत्तला फुफ्फसाचा कर्करोग झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्याची प्रकृती खालावली असून नुकताच त्याचा एक फोटा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी संजय दत्तच्या प्रकृतीवरून चिंता व्यक्त केली आहे.

संजय दत्तचे फोटो पाहून अनेक चाहत्यांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 'मुन्ना भाई एमबीबीएस स्टार लवकर बरा हो', अशा भावना एका सोशल मीडियावरील चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

संजय दत्तचा व्हायरल फोटो

संजय दत्तचे अनेक चाहते त्याला 'बाबा' या नावानेही संबोधतात. 'बाबा' तू खूप अशक्त झाल्यासारखा वाटतोय. लवकर बरा हो, अशी आशा करतो, असे एका चाहत्याने लिहिले आहे. तर संजय दत्तला लवकरच बरे वाटेल, असे एका चाहत्याने ट्विट केले आहे.

रुग्णालयातून माघारी जाताना संजय दत्त (संग्रहित छायाचित्र)

सध्या अभिनेता संजय दत्तवर मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऑगस्ट महिन्यात त्याला फुफ्फुसाचा कर्करोगाचे निदान झाले होते. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती अधिकृतरित्या सांगितली नव्हती. संजय दत्त बहिण प्रिया दत्तबरोबर अनेक वेळा मुंबईतील रुग्णालयात दिसला होता.

संजय दत्त

संजयने काही दिवसांपूर्वी आपण कामातून ब्रेक घेणार असल्याचे सोशल मीडियाद्वारे जाहीर केले होते. मात्र, त्याच्या आगामी 'सडक टू'च डबिंगचं काही काम शिल्लक असल्याने ते पूर्ण करून मगच तो ब्रेक घेणार असल्याची इंडस्ट्रीत चर्चा होती. पत्नी मान्यता अथवा बहिण प्रिया यापैकी कुणीही संजयला नक्की काय झालं, यास दुजोरा दिलेला नाही. मात्र, मान्यताने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात संजू एक 'फायटर' असून तो या परिस्थितीतून नक्की सुखरूपणे बाहेर पडेल, अशी आशा व्यक्त केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details