मुंबई - 'हिंदी मीडियम' चित्रपटाच्या यशानंतर आता चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'अंग्रेजी मीडियम' असं या चित्रपटाचं शीर्षक आहे. यात इरफान खान आणि राधिका मदन मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच जाहीर झालं होतं.
राधिका मदनचा 'अंग्रेजी मीडियम'च्या सेटवरील पहिला फोटो आला समोर - kareena kapoor
चित्रपटाच्या सेटवरील राधिकाचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत इरफान खान आणि चित्रपटाची संपूर्ण टीम आहे
आता चित्रपटाच्या सेटवरील राधिकाचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत इरफान खान आणि चित्रपटाची संपूर्ण टीम आहे. सध्या उदयपूरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटात करिना कपूरचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे.
इरफान खान या चित्रपटात 'चंपक' ही व्यक्तीरेखा साकारत आहे. त्याचे मिठाईचे दुकान असते. दीपक डोब्रियाल इरफानच्या भावाची भूमिका करीत असून मनू ऋषी त्याच्या चुलत बहिणीची भूमिका निभावणार आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.