महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Viral alert! रश्मिका मंदान्ना, विजय देवरकोंडा यांचा गोवा सुट्टीतील ऑनलाइन व्हिडिओ - रश्मिका देवरकोंडा ऑनलाईन व्हिडिओ

रश्मिका मंदान्ना विजय देवरकोंडासाठी हूटिंग आणि चीअर करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे. हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होत असते. मात्र त्यांनी अद्यापही याला दुजोरा दिलेला नाही.

रश्मिका मंदान्ना, विजय देवरकोंडा
रश्मिका मंदान्ना, विजय देवरकोंडा

By

Published : Jan 10, 2022, 6:53 PM IST

हैदराबाद (तेलंगणा) - अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या डेटींगच्या अफवा पुन्हा उफाळून येत आहेत. कारण त्यांच्या गोव्यातील सुट्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विजय आणि रश्मिका यांनी गोव्यात आपले कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांसह नवीन वर्षाचे स्वागत एकत्र केले होते.

गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड सारख्या चित्रपटात एकत्र काम केलेले रश्मिका आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे. तथापि, या जोडप्याने कधीही नातेसंबंधात असल्याचे कबूल केलेले नाही. परंतु त्यांच्या गुप्त प्रणयाची चर्चा अधून मधून रंगत असते.

लाइगरची पहिली झलक मित्र आणि कुटूंबासोबत पाहत असताना रश्मिका विजयसाठी हूटिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, पॉवर-पॅक्ड लाइगर टीझरमध्ये विजयची आई देखील विजयकडे पाहून आनंद व्यक्त करताना दिसत आहे. आणखी एका व्हायरल क्लिपमध्ये, रश्मिका आणि विजय गोव्यात त्यांच्या मित्रांसोबत जेवणाचा आनंद लुटताना दिसत आहेत.

याआधीच्या एका मुलाखतीत रश्मिकाला विचारण्यात आले होते की, शोबिझमधील मैत्री 'कशासाठी उपयोगी पडते?' यावेळी विजयसोबत असलेल्या मैत्रीचा संदर्भ देत रश्मिका म्हणाली होती की, "मला वाटतं की आम्ही आमच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात एकत्र आलो आहोत. कारण एकदा एखादा कलाकार मोठा झाला की आपल्याभोवती अडथळे तयार करतो, कारण कोणाला ड्रामा हवा असतो?"

अर्जुन रेड्डी स्टार विजय देवराकोंडा ही इंडस्ट्रीतील तिची सपोर्ट सिस्टीम आहे, असेही रश्मिकाने सांगितले होते. "मला वाटतं इंडस्ट्रीमध्ये माझ्याकडे एखादी व्यक्ती असेल तर तो (विजय) आहे." रश्मिकाने देखील कबूल केले होते की तिला त्याच्याकडून सल्ला मिळतो परंतु तिला जे योग्य वाटते तेच ती घेते.

'लाइगर'सह, विजय त्याच्या पहिल्या बहुभाषिक चित्रपटासाठी तयार आहे. तर रश्मिका देखील तिच्या बॉलीवूड पदार्पणाच्या 'मिशन मजनू'साठी तयारी करत आहे.

हेही वाचा -आर्मी एअर फोर्सवरील हे 7 चित्रपट यावर्षी होणार प्रदर्शित, पहा संपूर्ण यादी

ABOUT THE AUTHOR

...view details