मुंबईः अभिनेता विक्रांत मेस्सी आणि कृती खरबंदा आपल्याला झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या '१४ फेरे' या रोमँटिक कॉमेडीमध्ये एकत्र भूमिका करणार आहे.
"एक दुल्हा, एक दुल्हन और फेरे १४? तुम्हाला परिवारासह हजर राहण्याचे अंत:करणपूर्वक आमंत्रण # १४ फेरे, आमचे पुढचे प्रॉडक्शन 9 जुलै 2021 रोजी रिलीज होत आहे'', असे सांगत झी स्टुडिओने ट्विटरवर आपल्या आगामी प्रकल्पाची घोषणा केली.
या घोषणेबरोबरच या प्रोजेक्टच्या निर्मात्यांनी एक विचित्र व्हिडिओ शेअर केला आहे. या चित्रपटात विक्रम विक्रांत आणि कृती यांची मुख्य भूमिका आहेत.