मुंबई - अभिनेता हृतिक रोशनचा आगामी चित्रपट "विक्रम वेधा" 30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. सोमवारी हृतिकच्या वाढदिवसानिमित्त ( Hrithik Roshan 48th birthday ) चित्रपट निर्मात्यांनी यासंदर्भात एक घोषणा केली आहे. निर्मात्यांनी हृतिकच्या ४८व्या वाढदिवसानिमित्त वेधा चित्रपटातील अभिनेत्याचा फर्स्ट लूक ( first look of Vedha ) रिलीज केला आहे. या चित्रपटात हृतिक गँगस्टर वेधाची भूमिका साकारणार आहे.
चित्रपट निर्माता कंपनी ‘टी-सीरीज’ने ( T Series ) ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, "हृतिक रोशनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, विक्रम वेधा या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करताना आम्हाला आनंद होत आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे'.