महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

विक्रम भट्ट यांचा गुढ 'घोस्ट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Vikram Bhatt latest nws

विक्रम भट्ट यांनी नव्या चित्रपटाची तयारी केली असून 'घोस्ट' असा शीर्षक असलेला चित्रपट १८ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय.

घोस्ट पोस्टर रिलीज

By

Published : Sep 17, 2019, 9:07 PM IST

अंत्यत वेगळी वाट चोखाळणारे दिग्दर्शक अशी विक्रम भट्ट यांची ओळख आहे. आजवर त्यांनी ३० हून अधिक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. असंख्य चित्रपटांचे त्यांनी लेखन केलंय. सुमारे २५ वेब सिरीज त्यांच्या नावावर आहेत. आता भट्ट यांनी नव्या चित्रपटाची तयारी केली असून 'घोस्ट' असा शीर्षक असलेला चित्रपट १८ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय.

विक्रम भट्ट यांच्या आगामी 'घोस्ट' चित्रपटात कोण कलाकार झळकणार आहेत याचा उलगडा अद्याप झालेला नाही. चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून हे गुढ पोस्टर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारे आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी हे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details