मुंबई- टॉलिवूड अभिनेता विजय देवरकोंडा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. 'अर्जुन रेड्डी' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या विजयचा 'डिअर कॉम्रेड' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. यानंतर आता विजयनं आणखी एक चित्रपट साईन केला आहे.
'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडानं साईन केला 'हा' चित्रपट - सिनेमा
चार्मीनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून विजय आणि पूरी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत चित्रपटाबद्दलची घोषणा केली आहे. चित्रपटासाठी अभिनेत्रीची निवड करणं अद्याप बाकी आहे.
!['अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडानं साईन केला 'हा' चित्रपट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4117443-thumbnail-3x2-vijay.jpg)
पूरी जगन्नाथ या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून या चित्रपटाचं शीर्षक अद्याप निश्चित करण्यात आलं नाही. सिनेमाची निर्मिती पूरी जगन्नाथ आणि चार्मी कौर हे करणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं चार्मी आणि पूरी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.
चार्मीनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून विजय आणि पूरी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत चित्रपटाबद्दलची घोषणा केली आहे. चित्रपटासाठी अभिनेत्रीची निवड करणं अद्याप बाकी आहे. आता विजयच्या या आगामी सिनेमाची त्याचे चाहते निश्चितच आतुरेतेने वाट पाहत असणार आहेत.