महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

एकटा राहण्यासाठी जन्मलाय म्हणत अदा शर्माने केली विद्युत जामवालची मस्करी - Actress Ada Sharma

अभिनेत्री अदा शर्माने अभिनेता विद्युत जामवालची बुधवारी मस्करी केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या एका पोस्टर प्रतिक्रिया देताना मस्करी केली. यावर भरपूर प्रतिक्रिया मिळत आहेत.

-adah-sharma-comments
विद्युत जामवालची मस्करी

By

Published : Mar 11, 2021, 8:04 PM IST

मुंबई- अभिनेत्री अदा शर्मा आपल्या 'कमांडो ३' चा सहकलाकार विद्युत जामवालची मस्करी करण्याच्या मुडमध्ये दिसली. विद्युतने इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टवर तिने त्याच्या रिलेशन स्टेटसबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांच्यातील हा मस्करीला सुरूवात झाली ती विद्युत जामवालने इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमुळे. त्याने लिहिले होते, ''आनंदी आणि एकटा राहण्यासाठीच बनलोय. ( डिझाईन टू बी अलोन अँड हॅप्पी)'' यावर अदाने विद्युतच्या या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ''मी असे ऐकलंय की डिझाईन हे फॅशन अपग्रेड आहे. (आय हर्ड दॅट द डिझाईन हॅज हॅड ए फॅशन अपग्रेड).

यावर चाहत्यांच्या भरपूर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही चाहत्यांनी म्हटलंय की विद्युत कधीच एकटा राहू शकत नाही कारण आम्ही त्याच्यासोबत आहोत.

विद्युतने अलिकडे सनक या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात त्याची नायिका बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मित्रा आहे. तिचा हा बॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट आहे. कनिष्क वर्मा याचे दिग्दर्शन करीत आहेत. यात चंदन रॉय सन्याल आणि नेहा धुपिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.

हेही वाचा - 14 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थीं संतप्त, विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

ABOUT THE AUTHOR

...view details