मुंबई - 'कमांडो' फेम विद्युत जामवालची ओळख अॅक्शन हिरो अशीच आहे. मात्र त्याची आता विद्युतची रोमॅन्टिक चित्रपटासाठी वर्णी लागली आहे. दिग्दर्शक फारुख कबीर यांच्या आगामी 'खुदाहाफीज' या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटींगला उझबेकीस्तानमध्ये सुरूवात झाली आहे.
विद्युत जामवालच्या 'खुदाहाफीज'च्या शूटींगला उझबेकीस्तानमध्ये सुरूवात - Vidyut Jammwal latest news
दिग्दर्शक फारुख कबीर यांच्या आगामी 'खुदाहाफीज' या चित्रपटात विद्युत जामवालच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात झाली आहे.
'खुदाहाफीज' या चित्रपटाची अलिकडेच घोषणा करण्यात आली होती. फारुख कबीर यांनी यापूर्वी नसीरुद्दीन शाह आणि शर्मन जोशी यांची भूमिका असलेल्या 'अल्लाह के बंदे' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा असेल. या चित्रपटात अॅक्शन सीनदेखील असणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील टीम या अॅक्शन सीन्सला कोरियोग्राफ करतील. चित्रपटात विद्युतसोबत कोणती अभिनेत्री झळकणार, याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.
या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक हे दोघे मिळून करत आहेत. अभिषेक पाठक यांनी यापूर्वी 'प्यार का पंचनामा', 'दृश्यम' आणि 'रेड' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'खुदाहाफीज' या चित्रपटाचे चित्रीकरण हे मोरोक्को आणि केरळ या ठिकाणी होणार आहे. जुलै महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अधिकृत माहिती दिली आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.